बंद

  09.10.2021: राज्यपालांच्या हस्ते नवी मुंबई, ठाणे येथील करोना योद्धे सन्मानित

  प्रकाशित तारीख: October 9, 2021

  राज्यपालांच्या हस्ते नवी मुंबई, ठाणे येथील करोना योद्धे सन्मानित

  पोलीस अधिकारी, डॉक्टर्स, समाजसेवक राजभवन येथे सन्मानित

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. ९) नवी मुंबई तसेच ठाणे येथील डॉक्टर्स, पोलीस अधिकारी, समाजसेवक यांसह विविध क्षेत्रातील ३० करोना योद्ध्यांना करोना काळातील उल्लेखनीय सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले.

  जय फाउंडेशन व रुद्र फाउंडेशनतर्फे करोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

  कार्यक्रमाला आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, रुद्र फाउंडेशनचे संस्थापक धनंजय सिंह सिसोदिया व महाराणा प्रताप राजपूत महासंघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक प्रामुख्याने उपस्थित होते.

  राज्यपालांच्या हस्ते सुधाकर सोनावणे, माजी महापौर, सचिन एस. गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक, गणपत पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजय धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ जेम्स थॉमस, डॉ. गौतमी सोनावणे, आदींचा सत्कार करण्यात आला.