बंद

  09.10.2021: ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांना राजीव सारस्वत सन्मान प्रदान

  प्रकाशित तारीख: October 9, 2021

  ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांना राजीव सारस्वत सन्मान प्रदान
  साहित्य‍िक हस्तिमल हस्ती देखील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

  पानिपत, महानायक, झाडाझडती यांसह अनेक साहित्यकृतींचे लेखक विश्वास पाटील यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावर्षीचा ‘राजीव सारस्वत सन्मान’ प्रदान करण्यात आला.

  श्रुती संवाद साहित्य कला अकादमीतर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार विश्वास पाटील यांना शनिवारी (दि. ९) राजभवन येथे प्रदान करण्यात आला. जेष्ठ साहित्य‍िक हस्तिमल हस्ती यांना २०२० या वर्षासाठीचा राजीव सारस्वत सन्मान प्रदान करण्यात आला.

  सुप्रसिध्द साहित्यिक, कवी व हिंदुस्थान पेट्रोलियम येथे महाव्यवस्थापक (राजभाषा) पदावर कार्यरत असलेल्या राजीव सारस्वत यांचे मुंबईवर झालेल्या २६ नोव्हेंबर २००८ च्या अतिरेकी हल्यात निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रुती संवाद साहित्य कला अकादमीतर्फे साहित्यिकांना ‘राजीव सारस्वत सन्मान’ देण्यात येतो.

  कार्यक्रमाला श्रुती संवाद अकादमीचे अध्यक्ष अरविंद राही, हिंदुस्थान पेट्रोलियमचे व्यवस्थापक पुष्प जोशी, महासचिव डॉ. अनंत श्रीमाली आदी उपस्थित होते.

  यावेळी डॉ. वागीश सारस्वत, संजीव निगम तसेच इतर निवडक साहित्य‍िकांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.