बंद

  09.01.2022 : राज्यपालांच्या हस्ते भारतरत्न डॉ आंबेडकर तसेच बुद्ध शांती पुरस्कार प्रदान

  प्रकाशित तारीख: January 9, 2022

  राज्यपालांच्या हस्ते भारतरत्न डॉ आंबेडकर तसेच बुद्ध शांती पुरस्कार प्रदान

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल १२ वे भारतरत्न डॉ आंबेडकर पुरस्कार व आंतरराष्ट्रीय बुद्ध शांती पुरस्कार रविवारी (दि.९) राजभवन येथे प्रदान करण्यात आले.

  अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा (बजरंगी भाईजान) व केडिया सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक व गुंतवणूकदार डॉ. विजय केडिया यांना भारतरत्न डॉ आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

  वर्सोवा येथील आमदार डॉ भारती लवेकर, सामाजिक कार्यकर्ते सुभाषकुमार अग्रवाल, व्यावसायिक प्रशिक्षक पार्थ चक्रवर्ती, व्यावसायिक डॉ. मोईनुद्दीन बिन मोकसूद, सामाजिक कार्यकर्ते डॉ खालिद शेख, धर्मगुरू डॉ. परितोष कॅनिंग व मानव सेवा संस्थेचे अध्यक्ष विजय शहा यांना आंतरराष्ट्रीय बुद्ध शांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

  कार्यक्रमाला बुद्धांजलीचे अध्यक्ष कैलास मासूम व मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष भन्ते पंकज उपस्थित होते.