बंद

    08.10.2020: राम विलास पासवानयांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    प्रकाशित तारीख: October 8, 2020

    राम विलास पासवानयांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्नआणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंहकोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.केंद्रीय मंत्री श्री राम विलास पासवान यांच्या निधनाचे वृत्तधक्कादायक आहे. पासवान हे व्यापक जनाधार असलेले बिहार राज्यातील लोकप्रिय नेते होते.केंद्रातील अनेक सरकारांमध्ये त्यांनी मंत्री म्हणून कार्य करताना विविध खाती समर्थपणेसांभाळली. पासवान यांचा आणि माझा घनिष्ट परिचय होता. त्यांच्या निधनामुळे देशाने एकउत्तम संसदपटू आणि लोकप्रिय नेता गमावला आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थनाकरतो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या शोक संवेदना कळवतो, असे राज्यपालांनीआपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.