बंद

    08.08.2020: राज्यपालांची जेजे हॉस्पिटलला भेट; डॉक्टर्स, कर्मचार्‍यांना दिली कौतुकाची थाप

    प्रकाशित तारीख: August 10, 2020

    राज्यपालांची जेजे हॉस्पिटलला भेट; डॉक्टर्स, कर्मचार्‍यांना दिली कौतुकाची थाप

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्य शासनाच्या सर ज.जी. समूह रुग्णालयाला भेट देऊन सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत रुग्णसेवा देत असल्याबद्दल सर्व डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णसेवक व कर्मचार्‍यांना कौतुकाची थाप दिली. यावेळी रुग्णालयाचे डीन डॉ. रणजीत माणकेश्वर व वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे उपस्थित होते.