बंद

    08.04.2024: गुढी पाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: April 8, 2024

    गुढी पाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

    राज्यपाल रमेश बैस यांनी गुढी पाडवा तसेच नूतन वर्षानिमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षारंभानिमित्त शुभेच्छा देतो.

    देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी, युगादि, संसर पाडवो आणि चेटी चंड म्हणून साजरा केला जातो.

    यानिमित्त लोकांमधील परस्पर स्नेह, बंधुभाव व एकोपा वृद्धिंगत होवो, या प्रार्थनेसह सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.