बंद

    08.03.2021: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कुमाऊ विद्यापीठाचे चर्चासत्र

    प्रकाशित तारीख: March 8, 2021

    आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कुमाऊ विद्यापीठाचे चर्चासत्र
    महिलांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज : राज्यपाल

    स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महिला सक्षमीकरणाकरीता विविध प्रयत्न केले गेले. आज महिलांचे उच्च शिक्षणातील प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. अनेक महिला आयएएस, आयपीएस अधिकारी होत आहेत, तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. मात्र त्याचवेळी विविध क्षेत्रात महिला आजही मागे आहेत. देशाच्या उज्वल भवितव्यासाठी महिलांच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी सर्वंकष प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नैनिताल येथील कॅुमाँऊ विद्यापीठतर्फे आयोजित चर्चासत्राला दूरस्थ माध्यमातून संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.

    प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना आदराचे स्थान होते. मात्र परकीय आक्रमणामुळे देशात अनेक महिलाविरोधी कुप्रथा निर्माण झाल्या व त्या पुढे चालत राहिल्या. या प्रथा जावून महिलांना प्रयत्नपूर्वक पुढे आणले गेले पाहिजे व त्यादृष्टीने ठोस योजना तयार केल्या पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

    चर्चासत्राला कुमॉऊं विद्यापीठाचे कुलगुरु डॉ एन के जोशी, प्रा निता बोरा शर्मा, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षक, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते