बंद

    08.02.2021: डॉ. भुषण उपाध्याय, योगाचार्य संध्या दिक्षीत यांना स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान

    प्रकाशित तारीख: February 8, 2021

    डॉ. भुषण उपाध्याय, योगाचार्य संध्या दिक्षीत यांना स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान

    राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते कैवल्यधाम योग संस्था लोणावळा येथे स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. भारतीय पोलीस सेवेतील अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. भुषण उपाध्याय व कैवल्यधाम संस्थेतील योगाचार्य संध्या दिक्षीत यांना योग प्रचार व प्रसार कार्यासाठी हे पुरस्कार देण्यात आले.

    कैवल्यधामचे अध्यक्ष स्वामी महेशानंद, महासचिव ओमप्रकाश तिवारी, संशोधन सहसंचालक रणजीत सिंह भोगल व कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यावेळी उपस्थित होते.