बंद

  07.06.2021: मुळशी तालुक्यातील आग दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राज्यपालांना दुःख

  प्रकाशित तारीख: June 7, 2021

  मुळशी तालुक्यातील आग दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राज्यपालांना दुःख

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुळशी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातील आगीत झालेल्या जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

  पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीत काही निरपराध लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. सर्व मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आपल्या तीव्र शोक संवेदना कळवतो तसेच कारखान्यातील इतर सर्व लोकांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.
  *****