बंद

    07.05.2021: न्या. अंबादास जोशी यांनी घेतली गोव्याच्या लोकायुक्तपदाची शपथ

    प्रकाशित तारीख: May 7, 2021

    न्या.अंबादास जोशी यांनी घेतली गोव्याच्या लोकायुक्तपदाची शपथ

    मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती अंबादास हरिभाऊ जोशी यांनी आज (दि. ७) गोव्याच्या लोकायुक्तपदाची शपथ घेतली.

    महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या. जोशी यांना राजभवन मुंबई येथून दूरस्थ माध्यमातून लोकायुक्त पदाची शपथ दिली. गोवा राजभवन येथे झालेल्या शपथविधीला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील उपस्थित होते.