बंद

    07.04.2022 : ब्राझीलचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: April 7, 2022

    ब्राझीलचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

    ब्राझीलचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत जॉओ डी मेंडोन्सा लिमा नेटो यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. वाणिज्यदूत म्हणून आपल्या पारंपरिक कार्याशिवाय आपण व्यापाराला चालना देण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करू असे लिमा नेटो यांनी राज्यपालांना सांगितले.

    स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी राज्यपालांनी पालघर जिल्ह्यातील कातकरी महिलांनी वारली चित्रशैलीत रंगविलेल्या कुल्हडचा संच वाणिज्यदूतांना भेट दिला.