बंद

  07.02.2021 : पेजावार स्वामींनी घेतली राज्यपालांची भेट

  प्रकाशित तारीख: February 7, 2021

  पेजावार स्वामींनी घेतली राज्यपालांची भेट

  उडुपी, कर्नाटक येथील श्री पेजावार अधोक्षज मठाचे स्वामी विश्वप्रसन्नतीर्थ स्वामी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची रविवारी (दि. ७) राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

  अयोध्या राम मंदीर तीर्थ क्षेत्र न्यासाचे सदस्य म्हणून नियुक्ती झालेल्या श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामी यांनी अयोध्या येथील प्रस्तावित राम मंदीर निर्माण कार्याबददल माहिती दिली.

  यावेळी नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य, विश्व हिंदू परिषदेचे राज्य सच‍िव रामचंद्र रामुका, विहिंप महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष रामस्वरुप अगरवाल तसेच पेजावर मठाचे व्यवस्थापक रामदास उपाध्याय उपस्थित होते.

  *****