बंद

    07.01.2022 : जर्सन दा कुन्हा यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    प्रकाशित तारीख: January 7, 2022

    जर्सन दा कुन्हा यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ पत्रकार, जाहिरात निर्माते व रंगकर्मी जर्सन दा कुन्हा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

    “जर्सनदा कुन्हा हे स्वातंत्र्योत्तर काळापासून मुंबईच्या जडणघडणीचे साक्षीदार व अभ्यासू भाष्यकार होते. ऑल इंडिया रेडिओ, पीटीआय येथून आपल्या करिअरची सुरुवात करून दा कुन्हा यांनी पत्रकारिता, जाहिरात तसेच नाट्य क्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवला. मुंबईच्या नागरी, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर ते रोखठोक व अभ्यासपूर्ण मते मांडत. त्यांच्या निधनामुळे मुंबईवर प्रेम करणारे कला, संस्कृती व नागरी विश्वातील एक सर्जनशील व्यक्तिमत्व लोपले आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.