बंद

    ०७.०१.२०२० : ख्यातनाम चित्रकार अकबर पदमसी यांना पहिला वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार  

    प्रकाशित तारीख: January 8, 2020

    07.01.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ख्यातनाम चित्रकार अकबर पदमसी यांना पहिला वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार मरणोपरांत प्रदान करण्यात आला. कालच निधन झालेल्या पदमसी यांना ६० व्या राज्य कला प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये व स्मृतीचिन्ह असलेला हा पुरस्कार कलारक्षक अभिजीत गोंडकर यांनी स्वीकारला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण सचिव सौरभ विजय व प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा उपस्थित होते.