बंद

    06.11.2020 ‘करोना आव्हान संपले नाही; करोना योध्यांनी दुप्पट उत्साहाने सेवाकार्य सुरु ठेवावे’: राज्यपाल

    प्रकाशित तारीख: November 6, 2020

    भारत विकास परिषद कोंकण प्रांतातर्फे करोना वीरांचा सत्कार

    ‘करोना आव्हान संपले नाही; करोना योध्यांनी दुप्पट उत्साहाने सेवाकार्य सुरु ठेवावे’: राज्यपाल

    निरंजन हिरानंदानी, धर्मेश जैन, नैनेश शाह सन्मानित

    संकट प्रसंगी इतरांना मदत करण्याची भारताची थोर परंपरा आहे. करोना संसर्गाच्या काळात हा सेवाभाव प्रकर्षाने पहायला मिळाला. करोनाचे आव्हान अदयाप संपलेले नाही, त्यामुळे करोना योध्यांनी यानंतर देखील दुप्पट उत्साहाने सेवाकार्य सुरु ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    भारत विकास परिषदेच्या कोकण प्रातांतर्फे राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते करोना वीरांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

    सेवा करण्याची संधी इर्श्वर प्रत्येकाला देत नसतो. त्यामुळे ज्याला ही संधी मिळाली त्यांनी निस्वार्थ भावनेने कार्य केले पाहिजे. भारत विकास परिषद संस्कार, सेवा व समर्पण भावनेने कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी राज्यपालांनी काढले.

    राज्यपालांच्या हस्ते यावेळी बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, नैनेश शहा, निर्मल लाईफस्टाईलचे धर्मेश जैन, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त वर्षा दिक्षीत, कोवीड हॉस्पीटल पनवेलचे वैदयकीय अधिक्षक नागनाथ येम्पल्ले यांचा सत्कार करण्यात आला.

    हिरानंदानी हॉस्पिटलचे डॉ नीरज तुलारा, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स कोवीड सेंटरचे डॉ चेतन वेलानी, नर्सिंग अधिक्षक ज्योति खिमॉनंद पांडे, राज्यस्थानी सेवा संघाचे विश्वस्त विशाल टिब्रेवाला, सनदी लेखापाल सुनील पटोदिया, कोपरखैरणे लायन्स हॉस्पीटलचे अध्यक्ष सुरेन्द्र कुमार शर्मा, सनदी लेखापाल विनोद करंदीकर, आदि करोना योद्ध्यांचा देखील यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    भारत विकास परिषदेच्या कोकण प्रातांचे पदाधिकारी गिरीश समुद्र, ओमप्रकाश पांडे, डॉ. जिलेसिंह, श्रीमती चेतना कोरगावकर, धीरज सोनार, भवानी सिंह राठौड, रत्नेश चंद्र जैन, साधना जोशी, सुरेंद्र उसगावकर, जयंत फाळके, मीरा मिश्रा यांचा देखिल यावेळी राज्यपालांनी सत्कार केला.

    भारत विकास परिषदेच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष शरद मडीवाले, वित्त सचिव भीमजी रूपानी, सचिव लक्ष्मीनिवास जाजू व महासचिव महेश शर्मा यावेळी उपस्थित होते.