बंद

    06.05.2021: अजीत सिंह यांच्या निधनाबद्दल राज्यपाल कोश्यारी यांना शोक

    प्रकाशित तारीख: May 6, 2021

    अजीत सिंह यांच्या निधनाबद्दल राज्यपाल कोश्यारी यांना शोक

    माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजीत सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. अजीत सिंह यांनी देशाच्या तसेच उत्तर प्रदेशच्या राजकारणात प्रदीर्घ काळ महत्वाची भूमिका बजावली. माझा श्री अजीत सिंह यांचा घनिष्ट परिचय होता. संसद सदस्य या नात्याने शेतकऱ्यांच्या समस्यांना त्यांनी नेहमी वाचा फोडली. ईश्वर दिवंगत श्री अजीत सिंह यांच्या आत्म्यास आपल्या श्रीचरणांजवळ स्थान देवो अशी प्रार्थना करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.