बंद

    06.03.2024: राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न

    प्रकाशित तारीख: March 7, 2024

    राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न

    रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचा १२ वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी १०५८३ स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. एकूण ८७ उमेदवारांना सुवर्ण पदके व २५ रोख पारितोषिके देण्यात आली. चौदा स्नातकांना आचार्य ही पदवी देण्यात आली तर एका उमेदवाराला संशोधनपर विद्यावाचस्पती (डी.लिट.) पदवी देण्यात आली. दीक्षांत समारोहाला कुमार भास्कर वर्मा संस्कृत व पुरतानाध्यायन विद्यापीठ, नलबारी, आसामचे कुलगुरु प्रो. प्रल्हाद जोशी, विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. हरे राम त्रिपाठी, कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय व परीक्षा नियंत्रक डॉ जयवंत चौधरी आदी उपस्थित होते.