06.03.2023 : होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा
होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसेच धुलीवंदनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
परस्पर प्रेम, स्नेह व बंधुभावाचे प्रतिक असलेला रंगांचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व देशबांधवांमध्ये असलेली नात्यांची वीण अधिक घट्ट करो, या शुभकामनेसह सर्वांना होळी व धूलिवंदनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. होळी व रंगोत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचे आवाहन करतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.