बंद

    06.01.2024: राज्यपालांच्या हस्ते आयसीआयएचे पुरस्कार प्रदान

    प्रकाशित तारीख: January 6, 2024

    राज्यपालांच्या हस्ते आयसीआयएचे पुरस्कार प्रदान

    देशाच्या अर्थव्यवस्थेत सनदी लेखापाल यांची महत्वपूर्ण भूमिका – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई, दि.६ देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सनदी लेखपाल यांचा सहभाग महत्वाचा असून आर्थिक विकासाचा कणा आहे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

    हॉटेल ऑरिका येथे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया (ICAI) च्या वतीने आयोजित १७ व्या आयसीआयए पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना सीए हॉल ऑफ फेम व दिवंगत सीए राकेश झुनझुनवाला यांना प्रेरणादायी नेतृत्व श्रद्धांजली- सीए हॉल ऑफ फेम (मरणोत्तर) पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी सीए क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना आयसीएआय पुरस्काराने गौरविण्यात आले.

    यावेळी आयसीएआय अध्यक्ष अनिकेत तलाटी, उपाध्यक्ष रणजित कुमार अग्रवाल, उद्योग आणि व्यवसाय सदस्य समितीचे अध्यक्ष दुर्गेश कुमार काबरा उपाध्यक्ष रोहित रुवाटिया उपस्थित होते.

    राज्यपाल म्हणाले, उद्योग व्यवसायाच्या वृद्धीबरोबरच आव्हाने आणि संधी देखील विकसित होत आहेत. सनदी लेखापाल यांची भूमिका संख्या वाढविणे नाही तर आर्थिक शिस्त,पारदर्शकतेचे संरक्षक आणि शाश्वत आर्थिक व्यवहारांचे शिल्पकार आहेत.
    नवीन नियामक बदल आणि आर्थिक व्यवहारांची साखळी याला अधिक गती देण्यासाठी सनदी लेखापाल मोठी भूमिका बजावू शकतात.

    सन २००७ पासून आयसीआयए पुरस्कार हे उद्योग व्यवसाय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीना जाहीर करून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या पुरस्कार सोहळ्यामुळे उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांना प्रेरणा मिळेल. असे सांगून माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण मोठा बदल घडू शकता आणि आर्थिक व्यवहारात प्रभावी ठरू शकता त्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने प्रवास करताना नवकल्पना आणि नवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक स्वीकार करावा असे, आवाहनही राज्यपाल यांनी यावेळी केले.