बंद

  05.12.2021: राज्यपालांच्या हस्ते राज्यातील २८ महिला डॉक्टरांना ‘मेडीक्वीन एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान

  प्रकाशित तारीख: December 5, 2021

  राज्यपालांच्या हस्ते राज्यातील २८ महिला डॉक्टरांना ‘मेडीक्वीन एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उत्कृष्ट समाजकार्यासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील २८ महिला डॉक्टरांना रविवारी (दि. ५) राजभवन येथे ‘मेडीक्वीन एक्सलन्स’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या मेडीक्वीन या संस्थेतर्फे महिला डॉक्टरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

  कार्यक्रमाला मेडीक्वीनच्या संस्थापिका डॉ प्रेरणा बेरी – कालेकर, गोवर्धन इको व्हिलेजच्या महिला सक्षमीकरण कार्यक्रम प्रमुख डॉ संध्या सुब्रमण्यन व मेडीक्वीनच्या सचिव डॉ प्राजक्ता शाह उपस्थित होत्या.

  राज्यपालाच्या हस्ते यावेळी डॉ. ज्योती सूळ (लातूर), डॉ. जया जाणे (शिरपूर), डॉ. मिनाक्षी देसाई (मुंबई), डॉ. स्मिता घुले (पुणे), डॉ. कोमल मेश्राम (वर्धा), डॉ. अमिता कुकडे (कल्याण), डॉ. रेवती राणे (अकलूज), डॉ. अपर्णा देवईकर (चंद्रपूर), डॉ. रितू लोखंडे (पुणे), डॉ.अर्चना पवार (ठाणे), डॉ.जयश्री पाटील (कोल्हापूर), डॉ.ज्योती माटे (पुणे), डॉ. प्रेमा चौधरी (नागपूर), डॉ. उज्ज्वला बर्दापूरकर (भिवंडी), डॉ. मनिषा गरूड (पुणे), डॉ. इंद्रायणी चांदूरकर (बदलापूर), डॉ. चारुलता शहा (ठाणे), डॉ. स्मिता पाटील (नवी मुंबई), डॉ. अर्चना गोगुलवार (नागपूर), डॉ. स्नेहल पोटदुखे (चंद्रपूर), डॉ. सीमा शुक्ला (कल्याण), डॉ. गौरी चव्हाण (मुंबई), डॉ. प्रियंका बेंडाळे (नाशिक), डॉ. रुपाली गांगोडा (नाशिक) डॉ. कोमल काशीकर (नागपूर), डॉ. शीतल अभंगे, (लातूर) व डॉ. अपेक्षा चौधरी (मुंबई) यांचा सत्कार करण्यात आला.