बंद

    05.04.2022: राज्यपालांच्या हस्ते पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे उदघाटन

    प्रकाशित तारीख: April 5, 2022

    राज्यपालांच्या हस्ते पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे उदघाटन

    कोल्हापूर येथे पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष न्या. मदन महाराज गोसावी, स्वागताध्यक्ष डॉ सदानंद मोरे, कवयित्री डॉ अरुण ढेरे, लोककला अभ्यासक डॉ प्रकाश खांडगे, निमंत्रक मोहन गोस्वामी, काशी सुमेरू पिठाचे शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती तसेच देश विदेशातील संत साहित्य अभ्यासक उपस्थित होते.

    भारतातील संत विविध प्रांतातील व विविध भाषा बोलणारे असले तरीही सर्वांचा आंतरिक भाव एक होता. देशाची एकात्मता आणि अखंडता कायम ठेवून देशाला जोडण्याचे काम संतांनी केले असे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्रातील संत साहित्याचे अधिकाधिक अध्ययन व्हावे व त्याचा देशविदेशात प्रचार व्हावा असे राज्यपालांनी सांगितले.