बंद

  05.04.2021 : राज्यपाल कोश्यारी यांनी घेतला करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस

  प्रकाशित तारीख: April 5, 2021

  लसीकरण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान

  राज्यपाल कोश्यारी यांनी घेतला करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (५ एप्रिल) मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला.

  दिनांक ५ मार्च रोजी राज्यपालांनी याच शासकीय रुग्णालयात लसीचा पहिला डोस घेतला होता.

  करोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केल्याबद्दल राज्यपालांना केंद्र सरकारचे प्रमाणपत्र देण्यात आले.

  यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे आदी उपस्थित होते.