बंद

    31.10.2024: : राज्यपालांचे सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन राज्यपालांनी दिली राष्ट्रीय एकतेची शपथ

    प्रकाशित तारीख: October 31, 2024
    31.10.2024:  देशाचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.  माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला देखील राज्यपालांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.  राज्य शासनातर्फे सुरु असलेल्या  दक्षता जागृती सप्ताहानिमित्त राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांनी राज्यपालांचा संदेश वाचून दाखविला.

    राज्यपालांचे सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन राज्यपालांनी दिली राष्ट्रीय एकतेची शपथ

    देशाचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

    माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला देखील राज्यपालांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. राज्य शासनातर्फे सुरु असलेल्या दक्षता जागृती सप्ताहानिमित्त राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांनी राज्यपालांचा संदेश वाचून दाखविला.