बंद

    04.11.2021 : दीपावली निमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: November 4, 2021

    दीपावली निमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या शुभेच्छा

    महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

    करोनाचे सावट दूर होत असताना येत असलेले दीपावलीचे मंगल पर्व पुनश्च नवी उमेद, उत्साह, संपन्नता व सुख-शांती घेवून येवो. या सणाचा आनंद समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करुया. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.