बंद

    04.10.2024: नगदी पिकांसह तेलवर्गीय पिकांखालील क्षेत्रवाढीसोबतच ग्रामस्तरावर प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन गरजेचे – राज्यपाल

    प्रकाशित तारीख: October 4, 2024
    04.10.2024 : राज्यपालांनी दिली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्राला भेट

    नगदी पिकांसह तेलवर्गीय पिकांखालील क्षेत्रवाढीसोबतच ग्रामस्तरावर प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन गरजेचे – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    अकोला कृषी विद्यापीठाचे संशोधन कार्य समाधानकारक असल्याचे प्रक्षेत्र भेटीदरम्यान केले प्रतिपादन!

    महाराष्ट्र राज्य शेतमाल उत्पादन आणि फळपिकांसाठी देश पातळीवरील आघाडीचे राज्य असून पारंपारिक शेतीला या राज्यातील शेतकरी आता आधुनिकतेची जोड देत असून यामागे कृषी विद्यापीठांचे योगदान दिसून येत असल्याचे राज्यपाल महोदयांनी विद्यापीठ भेटीदरम्यान आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. तसेच यंदा विद्यापीठ शिवार फेरी चे माध्यमातून व्यावसायिक शेतीचे शाश्वत आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेतल्याने भविष्यात नगदी पिकांसह तेलवर्गीय पिकां खालील क्षेत्र वाढ अपेक्षित असल्याचे सांगतानाच गाव पातळीवरच प्रक्रिया उद्योग निर्माण होणे देखील गरजेचे असल्याचे राज्यपालांनी विद्यापीठ स्तरीय अधिकारी वर्गाशी वार्तालाप करताना सांगितले. तर यंदा अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने तब्बल 20 एकर प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी जिवंत पिक प्रात्यक्षिके साकारत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्मित शेती विषयक तंत्रज्ञान तथा पीक वाणांचे शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष अवलोकन करता यावे तसेच अत्याधुनिक शेती तंत्र आत्मसात करीत फायद्याच्या शेतीचे अनेक अनेक पैलू प्रत्यक्ष बघता यावे व शास्त्रज्ञासोबत चर्चेद्वारे शेतीविषयक शंका समाधान करता यावे या हेतूने विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन केले होते होते असे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी राज्यपाल महोदयांना अवगत केले. शिवार फेरीत सहभागी होणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींना खरीप हंगामातील जवळपास सर्व पिके व त्यांचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष बघता यावे या हेतूने गहू संशोधन विभागाचे प्रक्षेत्रावर शेतकरी बांधवाना पाहण्यासाठी एकाच ठिकाणी खरीप पिकांचे विविध जातीचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले आहेत.त्यामध्ये विविध पिकांच्या जाती लावण्यात आले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तेलबिया,कडधान्य, तृनधान्य,कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांचे जाती येथे लावण्यात आलेले आहेत. तसेच विद्यापीठाचे महत्वाचे 12 शिफारशी चे पण प्रात्यक्षिक येथे घेण्यात आले असल्याचे कुलगुरूनी सांगितले.
    अकोला येथे जिल्हा दौऱ्यासाठी आगमन झाल्यानंतर राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केलेला भेट दिली व विविध आधुनिक उपक्रमांची माहिती करून घेतली यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सरप पाटील, सौ हेमलता अंधारे, संशोधन संचालक डॉ विलास खर्चे, कुलसचिव सुधीर राठोड, अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार, महाबीज व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, यांचे सह विद्यापीठ संशोधक- शास्त्रज्ञ यांची उपस्थिती होती. राज्यपालांनी जिवंत पीक प्रात्यक्षिक क्षेत्राचे प्रत्यक्ष अवलोकन केले व विविध पिकांचे लागवड तंत्रज्ञान तथा शेतकरी वर्गापर्यंतचा प्रचार प्रसार आणि व्यावहारिक उपयोगिता देखील शास्त्रज्ञांकडून जाणून घेत समाधान व्यक्त केले.