बंद

    04.09.2021: “कच्छी भानुशाली समाजाचे करोना काळातील सेवाकार्य कौतुकास्पद”: राज्यपाल

    प्रकाशित तारीख: September 4, 2021

    ‘भानुशाली समाज भाग्यशाली’
                    “कच्छी भानुशाली समाजाचेकरोना काळातील सेवाकार्य कौतुकास्पद”: राज्यपाल 

    व्यापार उदीमाद्वारे धनसंग्रह करून वाडी-इमल्या बांधणे कठीणकाम नाही. परंतु ईश्वर कृपेने मिळालेली धनसंपदा आपल्याच उपेक्षित समाजबांधवांमध्ये निःस्वार्थपणे वाटणे हे श्रेयस्कर काम आहे असे सांगून कच्छी भानुशालीसमाजाने कष्टार्जित संपत्तीतून करोनाकाळात समाजासाठी केलेले सेवाकार्य कौतुकास्पदआहे, असे प्रशंसोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले. स्त्रियांसाठी कार्य करणारे जेडल फाउंडेशन व कच्छी भानुशालीसेवा समाजाच्या माध्यमातून करोनाकाळात उल्लेखनीय सेवाकार्य करणाऱ्या ३७ करोनायोद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते शनिवारी (दि. ४) राजभवन येथे सत्कार करण्यातआला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचायावेळी कच्छी टोपी व शाल देऊन सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाला जेडल फाउंडेशनच्या अध्यक्षा विजया चांद्रा,कच्छी भानुशाली सेवा समाज न्यासाचे अध्यक्ष नरेश सेठीया, वल्लभदास भद्रा, डोंबिवलीकच्छी भानुशाली मित्र मंडळाचे विश्वस्त – छायाचित्रकार नवीन भानुशाली, अनिल भद्राआदी मान्यवर उपस्थित होते.  भारताला संतांची मोठी परंपरा लाभली असून त्यांनी सांगितलेलीजीवनमूल्ये भारतीय समाजाचा स्थायीभाव झाला असल्याचे सांगताना समाजाचे ऋण मान्यकरणारा कच्छी भानुशाली समाज वास्तविक भाग्यशाली समाज आहे, असे राज्यपालांनीसांगितले. यावेळीनरेश धनजी शेठिया, वल्लभदास लीलाधर भद्रा, दिनेश लक्ष्मीदास चंद्रा, नवीन भानुशाली,अरविंद चंदुलाल चंद्र, राजेश पुरुषोत्तम जोईसर,धरमशीभाई, नारायण लक्ष्मीदास मिठीया,जितेंद्र परशोत्तम गजरा, मंजी प्रेमजी गजरा, सतीश हरीश भद्रा, भरत रमेश माव, वीरेनहरिराम गजरा, अनिल शेठिया, अमित मंगलदास मांगे, अनिल भद्रा, मेहुल नारायण भानुशाली, जगदीश जोईसर, जितेंद्र शंकरलाल शेठिया, राधा परिण जोईशर, परिननवीनचंद्र जोइशर, जितेश वालजी भानुशाली, उमेश पुरुषोत्तम भानुशाली, रावाजी नानजीदामा, विशाल दयाराम गोरी, जेठालाल नानजी भानुशाली, मंथन खिमजी गजरा, राजेश बाबूभाईभानुशाली, दर्शन चंदुलाल हेमानी, खुशालभाई गडा, अमर वल्लभदास गजरा, दर्शना दामले, मकरंद प्रभाकर प्रधान, धर्मेंद्रनवनीतलाल शाह, निवा सेजल विशाल गडा यांचाराज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.*****