04.04.2023 : इस्रायल संसद अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट
इस्रायल संसद अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट
इस्रायलच्या संसदेचे (नेसेट) अध्यक्ष अमिर ओहाना यांनी एका संसदीय शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी संसद सदस्य मिशेल बिटन व अमित हलेवी, इस्रायलचे भारतातील राजदूत नौर गिलोन, वाणिज्यदूत कोब्बी शोशानी तसेच इतर सदस्य उपस्थित होते.