बंद

  03.12.2020 : राज्यपाल कोश्यारी यांचेकडून सोलापूर येथील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांचे अभिनंदन

  प्रकाशित तारीख: December 3, 2020

  राज्यपाल कोश्यारी यांचेकडून सोलापूर येथील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांचे अभिनंदन

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झालेले सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक श्री रणजीतसिंह डिसले यांचे अभिनंदन केले आहे.

  सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री रणजीतसिंह डिसले यांना लंडनस्थित वर्की फाऊंडेशनच्या विद्यमाने दिला जाणारा १- दशलक्ष डॉलर पुरस्कार रक्कम असलेला ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री डिसले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

  नावीन्यपूर्ण संकल्पना तसेच तंत्रज्ञानाची मदत घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे श्री डिसले कार्य अनुकरणीय व कौतुकास्पद आहे, असे राज्यपालांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे.