बंद

    03.08.2026: आर्यनचे माजी मुख्याध्यापक नीलकंठ नामजोशी यांचेकडून राज्यपालांना पुस्तक भेट

    प्रकाशित तारीख : August 3, 2026
    03.08.2026:   गिरगाव मुंबई येथील आर्यन हायस्कुलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नीलकंठ नामजोशी यांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपण लिहिलेल्या तीन पुस्तकांचा संच भेट दिला.  लेखकांचे अभिनंदन  करताना राज्यपाल म्हणाले की, जेव्हा लेखक पुस्तक लिहितो, तेव्हा तो आपल्या विचारांना पंख देतो व जगाच्या ज्ञानात भर घालतो. पुस्तक कधीही मरत नाही. लेखक समाजाला काहीतरी परत देत असतो.  एकमेकांना भेटताना पुष्पगुच्छ न देता पुस्तके दिली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.   महाराष्ट्र ही संत आणि वीरांची भूमी आहे. राज्यात लेखकांची देखील एक मोठी परंपरा आहे. आज आपण ई-पुस्तकांच्या युगात वावरत असलो तरी देखील पारंपरिक पुस्तक वाचनाचे महत्व वेगळे आहे व पुस्तक वाचनाचा आनंद कायम आहे. नव्या युगात पारंपरिक पुस्तक वाचनाचा आनंद हरवू नये, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.नामजोशी यांनी राज्यपालांना 'मोगरा फुलाला दारी' हा कथासंग्रह, 'स्मृतिगंध' हे समाजातील गणमान्य व्यक्तींशी केलेल्या पत्रव्यवहाराचे संकलन असलेले पुस्तक तसेच 'भीमा' ही आदिवासी मुलीच्या कर्तृत्वाची व तिच्या आईच्या त्यागाची कहाणी असलेली कादंबरी भेट दिली. यावेळी नामजोशी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

    आर्यनचे माजी मुख्याध्यापक नीलकंठ नामजोशी यांचेकडून राज्यपालांना पुस्तक भेट

    पारंपरिक पद्धतीने पुस्तक वाचनाचा आनंद हरवू नये: राज्यपाल

    गिरगाव मुंबई येथील आर्यन हायस्कुलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नीलकंठ नामजोशी यांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपण लिहिलेल्या तीन पुस्तकांचा संच भेट दिला.

    लेखकांचे अभिनंदन करताना राज्यपाल म्हणाले की, जेव्हा लेखक पुस्तक लिहितो, तेव्हा तो आपल्या विचारांना पंख देतो व जगाच्या ज्ञानात भर घालतो. पुस्तक कधीही मरत नाही. लेखक समाजाला काहीतरी परत देत असतो. एकमेकांना भेटताना पुष्पगुच्छ न देता पुस्तके दिली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

    महाराष्ट्र ही संत आणि वीरांची भूमी आहे. राज्यात लेखकांची देखील एक मोठी परंपरा आहे. आज आपण ई-पुस्तकांच्या युगात वावरत असलो तरी देखील पारंपरिक पुस्तक वाचनाचे महत्व वेगळे आहे व पुस्तक वाचनाचा आनंद कायम आहे. नव्या युगात पारंपरिक पुस्तक वाचनाचा आनंद हरवू नये, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

    नामजोशी यांनी राज्यपालांना ‘मोगरा फुलाला दारी’ हा कथासंग्रह, ‘स्मृतिगंध’ हे समाजातील गणमान्य व्यक्तींशी केलेल्या पत्रव्यवहाराचे संकलन असलेले पुस्तक तसेच ‘भीमा’ ही आदिवासी मुलीच्या कर्तृत्वाची व तिच्या आईच्या त्यागाची कहाणी असलेली कादंबरी भेट दिली. यावेळी नामजोशी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
    **

    पारंपरिक पुस्तकों के पठन का आनंद कभी समाप्त नहीं होना चाहिए: राज्यपाल

    मुंबई के आर्यन हाई स्कूल के पूर्व प्राचार्य नीलकंठ नामजोशी ने मुंबई स्थित लोक भवन में महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा से शिष्टाचार भेंट की और उन्हें अपनी लिखी तीन पुस्तकों का सेट भेंट किया।

    लेखक की सराहना करते हुए राज्यपाल ने कहा कि पुस्तक लेखन व्यक्ति के विचारों को नई उड़ान देता है और मानवता की सामूहिक ज्ञान-संपदा को समृद्ध बनाता है। उन्होंने कहा कि एक पुस्तक कभी नहीं मरती, बल्कि पीढ़ी-दर-पीढ़ी लोगों को प्रेरित करती रहती है। प्रत्येक लेखक अपनी रचनाओं के माध्यम से समाज को एक सार्थक योगदान देता है।

    राज्यपाल ने महाराष्ट्र को संतों, समाज सुधारकों और वीरों की भूमि बताते हुए कहा कि इस प्रदेश ने देश को छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, लोकमान्य बाल गंगाधर तिलक, गोपाल कृष्ण गोखले सहित अनेक महान विभूतियाँ दी हैं। उन्होंने कहा कि महाराष्ट्र की साहित्यिक परंपरा भी अत्यंत समृद्ध और गौरवशाली रही है।

    राज्यपाल ने कहा कि यद्यपि आज का युग ई-पुस्तकों और डिजिटल तकनीक का है, फिर भी पारंपरिक मुद्रित पुस्तकों का महत्व और प्रासंगिकता आज भी बरकरार है। उन्होंने कहा कि मुद्रित पुस्तक पढ़ने का आनंद और उससे जुड़ा आत्मीय अनुभव कभी समाप्त नहीं होना चाहिए, क्योंकि पुस्तक पढ़ना केवल जानकारी प्राप्त करना नहीं, बल्कि एक गहन, व्यक्तिगत और समृद्ध अनुभव है।

    नामजोशी ने राज्यपाल को लघुकथा संग्रह ‘मोगरा फुलला दारी’, विभिन्न क्षेत्रों की प्रतिष्ठित हस्तियों के साथ हुए पत्राचार का संकलन ‘स्मृतिगंधा’ तथा एक आदिवासी बालिका की उपलब्धियों और उसकी माँ के त्याग की प्रेरक कहानी पर आधारित उपन्यास ‘भीमा’ भेंट किया। इस अवसर पर नामजोशी के परिवार के सदस्य भी उपस्थित थे।

    **