03.06.2024: दिव्यांग क्रिकेटपटूंनी घेतली राज्यपालांची भेट; विद्यापीठांच्या मैदानावर सराव करू देण्याची मागणी

दिव्यांग क्रिकेटपटूंनी घेतली राज्यपालांची भेट; विद्यापीठांच्या मैदानावर सराव करू देण्याची मागणी
मुंबई व्हीलचेअर क्रिकेट चमूच्या सदस्यांनी नीलोत्पल मृणाल यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली.
व्हीलचेअर क्रिकेट खेळणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना मुंबई तसेच राज्यातील इतर सार्वजनिक विद्यापीठांच्या व महाविद्यालयांच्या मैदानावर सराव करु द्यावा, या दृष्टीने विद्यापीठांना सूचना कराव्या अशी मागणी यावेळी दिव्यांग खेळाडूंनी केली.
अनेक दिव्यांग खेळाडू व क्रिकेटपटू गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील असून खासगी क्लब / जिमखाना येथे जाऊन सराव करणे त्यांना परवडत नाही.
विद्यापीठाच्या मैदानावर सरावासाठी दिव्यांगांना मनाई केली जाते असे सांगून विद्यापीठांनी दिव्यांगखेळाडूंना सरावासाठी मैदाने वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी दिव्यांग खेळाडूंनी केली.