बंद

  03.05.2022: रमजान ईद : राज्यपालांनी दिल्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा

  प्रकाशित तारीख: May 3, 2022

  रमजान ईद : राज्यपालांनी दिल्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. ३) राजभवन येथे मुस्लिम कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.

  राजभवन मुस्लिम जमातच्या सदस्यांनी आपल्या कुटुंबीयांसहित राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तसेच त्यांच्या मुलांची चौकशी केली.
  राज्यपालांनी खिरीचा आस्वाद घेतला व सर्वांना मिठाई वाटप केले.

  यावेळी अजीज शेख, शमसुद्दीन शेख, अल्ताफ सय्यद, हाफिज अब्दुल सैयद, इफ्तिखार अली व फिरोज सय्यद प्रामुख्याने उपस्थित होते.