02.09.2024- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन
मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : मा.राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांचे मा. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार विनय कोरे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरचे ब्रिगेडीअर ए. एस. वाळींबे, सीआयडी विभागाचे एडीजी प्रशांत बुरडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनीही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका): भारताच्या मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज करवीर निवासिनी श्रीअंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधिवत पूजा केली. तसेच एकारती, पंचारती व कर्पुरआरती करुन देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले.
यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहाय्यक आयुक्त समीर मुजावर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी आदी उपस्थित होते.
सुरुवातीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. दर्शनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून श्री अंबाबाई देवीच्या मंदिराविषयी माहिती जाणून घेतली तसेच मंदिरातील दगडी झुंबर व शिल्पकलेची पाहणी केली. देवीच्या किरणोत्सवाची माहिती जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी त्यांना दिली. देवीचे दर्शन झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाधान व्यक्त केले.
श्री अंबाबाई मंदिराच्या इतिहासात प्रथमच भारताच्या राष्ट्रपती यांनी श्री अंबाबाई मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.