बंद

  02.02.2021 : अरुण साठे लिखीत ‘माझी राजकीय मुशाफिरी’ पुस्तकाचे प्रकाशन

  प्रकाशित तारीख: February 2, 2021

  अरुण साठे लिखीत ‘माझी राजकीय मुशाफिरी’ पुस्तकाचे प्रकाशन

  राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पुढे येणाऱ्यांसाठी प्रेरणादायी पुस्तक – राज्यपाल

  मुंबई, दि. 2 : अरुण साठे लिखीत ‘माझी राजकीय मुशाफिरी’ हे पुस्तक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पुढे येणाऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून खूप काही शिकण्यासारखे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले

  अरुण साठे लिखीत ‘माझी राजकीय मुशाफिरी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांतदादा पाटील , मंगल प्रभात लोढा, प्रकाशक आनंद लिमये, आरती साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

  श्री.कोश्यारी म्हणाले ,आदर्श जीवन कसे जगावे याचे वर्णन अरुण साठे यांच्या ‘माझी राजकीय मुशाफिरी’ या पुस्तकात सांगितले आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी समोर आणल्या आहेत. सर्वांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आवाहन राज्यपाल महोदयांनी यावेळी केले. या पुस्तकाच्या माध्यमातून श्री. साठे यांनी खुप चांगले काम केले आहे. हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नसून या पुस्तकाच्या माध्यमातून खूप काही शिकण्यासारखे आहे. या पुस्तकातून वास्तवचित्र उभे करण्यात आले आहे. या पुस्तकात जीवनसार नमूद करण्यात आले आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासाठी हे पुस्तक निश्चितच प्रेरणादायी असल्याचे राज्यपालांनी पुढे सांगितले.