बंद

    01.09.2022: नाश‍िक मधील दाते बांबू वाटिकेला राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: September 1, 2022

    नाश‍िक मधील दाते बांबू वाटिकेला राज्यपालांची भेट

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे एक दिवसाच्या नाशिक जिल्हा भेटीसाठी आगमन झाले. ओझर विमानतळ येथे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यांचे स्वागत केले.
    यावेळी पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पलकुंडवर व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज लाखलगाव, जिल्हा नाशिक येथे बांबूची लागवड करणारे प्रगतिशील शेतकरी प्रशांत दाते यांनी सुरु केलेल्या दाते बांबू वाटिकेला (दाते बांबूसेतम् ) भेट देऊन वाटिकेची पाहणी केली.
    दाते बांबू वाटिका देशातील अशा प्रकारची पहिली वाटिका असून या वाटिकेमध्ये देशातील सर्वाधिक बांबू प्रजातींचे संकलन करण्यात आले असल्याची माहिती दाते यांनी दिली. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण कोसकर, नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आदी उपस्थित होते.