बंद

    01.08.2021:राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत शंकरलाल खंडेलवाल जन्मशताब्दी समारोहाची सांगता

    प्रकाशित तारीख: August 1, 2021

    राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत शंकरलाल खंडेलवाल जन्मशताब्दी समारोहाची सांगता

    ज्येष्ठ समाजसेवक व अकोला जिल्हा संघचालक स्व. श्री. शंकरलाल ‘काकाजी’ खंडेलवाल जन्मशताब्दी वर्षाचा समापन समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी ‘शिक्षणातून मुल्यांचा अविष्कार’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

    स्व. शंकरलाल खंडेलवाल हे राष्ट्रकार्याला समर्पित ‘समग्र व्यक्तित्व’ होते असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर, चंद्रशेखर राठी, अतुलभाई गणात्रा, गोपाल खंडेलवाल, महेन्द्र कवीश्वर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.