बंद

    01.06.2021: राधाकृष्ण नार्वेकर यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    प्रकाशित तारीख: June 1, 2021

    राधाकृष्ण नार्वेकर यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

    ज्येष्ठ पत्रकार, दैनिक सकाळचे माजी संपादक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री. राधाकृष्ण नार्वेकर यांचे निधन झाल्याचे वृत्त समजून दुःख झाले. आपल्या प्रदीर्घ वाटचालीत नार्वेकर यांनी विविध विषयांवर जनसामान्यांचे प्रबोधन केले तसेच आपल्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या पिढ्या घडविल्या. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आजवरच्या विविध महत्वपूर्ण घटनांचे ते साक्षीदार होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका अभ्यासू पत्रकार व सुहृद व्यक्तिमत्वाला मुकला आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.