01.05.2024:- 65 व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. रमेश बैस यांचा संदेश
65 व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. रमेश बैस यांचा संदेश. शिवाजी पार्क, मुंबई, बुधवार, दि. 1 मे, 2024
बंधू आणि भगिनींनो,
संत आणि समाजसुधारकांच्या महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला वंदन करून 65 व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.
आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये कामगारांचे बहुमोल योगदान आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
आजच्या उत्कृष्ट संचलन सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व दलांच्या जवानांचे मी अभिनंदन करतो.
बंधू आणि भगिनींनो,
सामाजिक सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमी अग्रस्थानी राहिलेला आहे. सामाजिक समता, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाकरिता आपले आयुष्य वेचणाऱ्या ध्येयवादी नेत्यांचा महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे, हे आपले भाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर आणि समाजसुधारक नेत्यांचे याप्रसंगी स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरेल.
महाराष्ट्राच्या विविधतेतून संपूर्ण भारताचे दर्शन घडते. देशातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे. जगभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासक यांना आकर्षित करणारी उच्च दर्जाची अनेक विद्यापीठे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक संस्था आपल्या राज्यात आहेत.
महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. विस्तीर्ण असे विलोभनीय समुद्रकिनारे, पर्वत रांगा, वने, गड-किल्ले, नदी खोरे आणि पठारे यामुळे आपले राज्य नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध झाले आहे. विपुल जैवविविधतेने नटलेले ताडोबा, मेळघाट, पेंच यासारखी अभयारण्ये देखील आपल्या राज्याला लाभली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सर्वाधिक आवडीच्या ठिकाणांपैकी एक ठरले आहे.
महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती औद्योगिक विकासाला पोषक अशी आहे. देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र नेहमीच गुंतवणुकदारांच्या आकर्षणाचे केंद्र राहिला आहे. आपले राज्य हे देशाचे आर्थिक शक्तीकेंद्र असून देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्राने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र हे शेती, औद्योगिक उत्पादने, व्यापार आणि दळणवळण क्षेत्राच्या बाबतीत देखील देशातील आघाडीच्या राज्यांपैकी एक आहे.
महाराष्ट्राच्या विकासात मुंबईचे मोठे योगदान राहिले आहे. येथे बहुसंख्य बँका, उद्योग समूह आणि वित्तीय संस्थांची मुख्यालये आहेत. भारताचा सर्वात मोठा शेअर बाजार आणि जगप्रसिद्ध अशी चित्रपट नगरी याच शहरात आहे. मुंबई हे भारताच्या महत्त्वाच्या बंदरांपैकी एक आहे. येथून मोठ्या प्रमाणावर विदेशी व्यापार चालतो. औद्योगिक उत्पादने, आर्थिक आणि सेवा क्षेत्राचे हे एक महत्वाचे केंद्र आहे. याचबरोबर पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी शहरे देखील विविध क्षेत्रांतील शक्तीकेंद्रे आहेत. सायबर सुरक्षेची अंमलबजावणी करण्यात आणि नागरिक व उद्योगव्यवसायांना सुरक्षित सायबर सेवा देण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही आपल्या राज्याची मोठी शक्ती आहे.
संसदीय लोकशाहीमध्ये नियमितपणे होणाऱ्या निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी तसेच बळकट करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असतो. देशात सध्या लोकसभेसाठी निवडणुका सुरू आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन देखील मी करतो.
एक नवीन, समृद्ध व बलशाली असा महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येण्याचे मी सर्व नागरिकांना आवाहन करीत आहे. पुन्हा एकदा, महाराष्ट्र स्थापना दिनाच्या या प्रसंगी महाराष्ट्राच्या जनतेला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
——————
65 वें महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस के अवसर पर महाराष्ट्र के राज्यपाल श्री. रमेश बैस का संदेश। शिवाजी पार्क, मुंबई, बुधवार, दि. 1 मई, 2024
भाइयों और बहनों,
संतों और समाज सुधारकों की महाराष्ट्र की इस पवित्र भूमि को नमन करते हुए मैं 65 वें महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस के अवसर पर महाराष्ट्र की जनता को हार्दिक शुभकामनाएं देता हूँ।
महाराष्ट्र के निर्माण के लिए अपने प्राणों की आहुति देनेवाले शहीदों को मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ।
आज अंतरराष्ट्रीय श्रमिक / कामगार दिवस भी है। महाराष्ट्र और देश के निर्माण में श्रमिकों का बहुत बड़ा योगदान है। इसके लिए मैं उन्हें हार्दिक बधाई देता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ।
आज के उत्कृष्ट संचलन समारोह में शामिल सभी का मैं अभिनंदन करता हूँ।
भाइयों और बहनों,
सामाजिक सुधार को लेकर महाराष्ट्र हमेशा ही अग्रस्थान पर रहा है। यह हमारा सौभाग्य है कि सामाजिक समता, शिक्षा, महिला सशक्तिकरण और अंधविश्वास उन्मूलन के लिए अपने जीवन को अर्पित करनेवाले लक्ष्यवादी नेताओं की बड़ी विरासत महाराष्ट्र को प्राप्त है।
इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपति शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जैसे अनेक महान विभूतियों और समाज सुधारक नेताओं को याद करना औचित्यपूर्ण होगा।
महाराष्ट्र की विविधता से समूचे भारत का दर्शन होता है। देश में सबसे अधिक साक्षरता दर वाले राज्यों में से महाराष्ट्र एक राज्य है।
दुनियाभर से छात्रों, शोधकर्ताओं और चिकित्सकों को आकर्षित करनेवालें उच्च गुणवत्तावाले विश्वविद्यालय और व्यावसायिक पाठ्यक्रमों की शैक्षणिक संस्थाएं हमारे राज्य में हैं।
महाराष्ट्र में एक समृद्ध संत परंपरा और सांस्कृतिक विरासत है। हमारा राज्य अपने शानदार समुद्र तटों, पर्वत श्रृंखलाओं, जंगलों, किलों, नदी घाटियों और पठारों की विस्तृत श्रृंखला के कारण प्राकृतिक सुंदरता से समृद्ध है।
ताडोबा, मेलघाट, पेंच जैसे अभयारण्य भी हमारे राज्य में हैं, जो जैव विविधता से समृद्ध हैं। इसीलिए महाराष्ट्र देश और विदेश से पर्यटकों को आकर्षित करने वाले सबसे लोकप्रिय स्थलों में से एक बन गया है।
महाराष्ट्र की भौगोलिक स्थिति औद्योगिक विकास के लिए अनुकूल है। देशांतर्गत एवं विदेशी निवेश के लिए महाराष्ट्र हमेशा से ही निवेशकों के आकर्षण का केंद्र रहा है।
हमारा राज्य देश की आर्थिक शक्ति का केंद्र है और महाराष्ट्र ने हमेशा देश के ढांचागत विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। कृषि, औद्योगिक उत्पाद, व्यापार और संचार क्षेत्रों के मामले में भी देश के अग्रणी राज्यों में से एक महाराष्ट्र राज्य है।
महाराष्ट्र के विकास में मुंबई का बहुत बड़ा योगदान रहा है। यहाँ पर अधिकांश बैंकों, उद्योग समूहों और वित्तीय संस्थानों के मुख्यालय है।
भारत का सबसे बड़ा शेयर बाजार और विश्व प्रसिद्ध फ़िल्म सिटी इसी शहर में है। मुंबई यह भारत के महत्वपूर्ण बंदरगाहों में से एक है। यहां से बड़ी मात्रा में विदेशी व्यापार होता है।
औद्योगिक उत्पादों, वित्तीय और सेवा क्षेत्रों का यह एक महत्वपूर्ण केंद्र है। इसके साथ ही पुणे, नागपुर, कोल्हापुर, नासिक, छत्रपति संभाजीनगर, सोलापुर आदि शहर भी विभिन्न क्षेत्रों में शक्ति केंद्र हैं।
साइबर सुरक्षा का क्रियान्वयन करने और नागरिकों एवं व्यवसायों को सुरक्षित साइबर सेवाएं प्रदान करने में महाराष्ट्र सबसे आगे है। उद्यमशील, प्रगतिशील, व्यावहारिक एवं कड़े परिश्रम करनेवाले नागरिक हमारे राज्य की सबसे बड़ी ताकत हैं।
संसदीय लोकतंत्र में नियमित रूप से होनेवाले चुनाव लोकतंत्र का उत्सव होता है। लोकतंत्र को बनाए रखने और मजबूत करने के लिए नागरिकों की भागीदारी महत्वपूर्ण होती है।
देश में अभी लोकसभा के चुनाव चल रहे हैं। मैं सभी मतदाताओं से भी अपील करता हूँ कि लोकतंत्र के इस उत्सव में अपने मताधिकार का प्रयोग करें।
मैं इस अवसर पर महाराष्ट्र की जनता से एक नए, समृद्ध और मजबूत महाराष्ट्र के निर्माण के लिए एक साथ आने की अपील करता हूँ। पुनश्च, महाराष्ट्र दिन के इस अवसर पर राज्य की जनता को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ।
जय हिंद। जय महाराष्ट्र।।