बंद

    01.03.2022: राज्यपालांच्या हस्ते १३० व्या अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन

    प्रकाशित तारीख: March 2, 2022

    राज्यपालांच्या हस्ते १३० व्या अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रकार रवि परांजपे यांना कलाविश्वातील योगदानाबद्दल यंदाचा ‘रूपधर’ जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे आयोजित १३० व्या अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते जहांगीर आर्ट गॅलरी येथे करण्यात आले, त्यावेळी परांजपे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

    कार्यक्रमाला जिंदल फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदल, बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, चेअरमन नरेंद्र विचारे, कलाकार व विद्यार्थी उपस्थित होते.

    राज्यपालांच्या हस्ते यावेळी व्यवसायिक तसेच विद्यार्थी प्रवर्गातील कलाकारांना पुरस्कार व शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आले.