बंद

  01.03.2022: ब्रह्मकुमारीच्या राज्यातील ‘स्वर्णिम भारत’ अभियानाला राज्यपालांच्या उपस्थितीत आरंभ

  प्रकाशित तारीख: March 1, 2022

  ब्रह्मकुमारीच्या राज्यातील ‘स्वर्णिम भारत’ अभियानाला राज्यपालांच्या उपस्थितीत आरंभ

  ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयतर्फे आयोजित ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताकडे’ या अभियाना अंतर्गत राज्यात आयोजित विविध कार्यक्रमांचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. १) राजभवन येथे झाला.

  ब्रह्माकुमारी या संस्थेने सुरुवातीपासून महिलांकडे नेतृत्व दिल्याबद्दल राज्यपालांनी संस्थापकांच्या दूरदृष्टीला वंदन केले. यावेळी राजयोग ध्यान घेण्यात आले. राज्यपालांनी यावेळी मोटर बाईक रॅलीला झेंडी दाखवून रवाना केले.

  कार्यक्रमाला ब्रह्माकुमारीच्या महाराष्ट्र झोनच्या प्रभारी राजयोगिणी संतोष दिदी, राजयोगिणी नलिनी, रुक्मिणीबेन, गोदावरी, वंदना व ब्रहमाकुमारी परिवारातील सदस्य उपस्थित होते.