१७. ०१. २०२० युवकांनी उद्योजक बनून रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या : राज्यपाल
समर्थ, समृद्ध आणि संपन्न भारतघडविण्यासाठी युवकांनी केवळ नोकरीसाठी प्रयत्न न करता उद्योजक बनून इतरांसाठीनोकऱ्या निर्माण कराव्या असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज केले. सध्याच्याशिक्षण व्यवस्थेतून निर्माण होणारे बहुतेक युवक नौकरीच्या शोधात दिसतात. युवकांनीनौकरीसाठी प्रयत्न सुरूच ठेवावे, परंतु त्याहीपेक्षा उद्योजक बनण्याचा प्रयत्नकरावा, असे राज्यपालांनी सांगितले. चर्नी रोड येथील के.पी.बी.हिंदुजा वाणिज्य महाविद्यालाच्या ४६ व्या वार्षिकदिनानिमित्त बिर्ला मातोश्री सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. केवळ ज्ञान प्राप्त केल्याने व्यक्तित्वघडत नाही; तर व्यक्तित्व चारित्र्य, शिस्त, सचोटी व शालीनता यातून घडते. विद्यार्थ्यांनीडोळ्यांसमोर मोठे ध्येय ठेवावे व त्याच्या प्राप्तीसाठी अथक प्रयत्न करावे असेराज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले. हिंदुजा भावी योजनांसाठी व आंतरराष्ट्रीयसहकार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले. ‘हिंदुजा विद्यापीठ’स्थापन करणार हिंदुजा समूह आता ‘हिंदुजाविद्यापीठ’ स्थापनेसाठी प्रयत्नशील असल्याचे समूहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा यांनीयावेळी सांगितले. हिंदुजा महाविद्यालयाच्या सध्याच्याजागी पुढील तीन वर्षांत नवीन अत्याधुनिक वास्तू उभी करणार असल्याचे सांगून, हिंदुजासमूह लंडन स्कूल ऑफ ईकॉनॉमिक्सशी सहकार्य करण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनीसांगितले. मेधावी भारतीय विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी बाहेर देशात जातात व तेथेच स्थिरावतात, हे चित्र आपण बदलू शकतो असेत्यांनी सांगितले. हिंदुजा महाविद्यालयाच्याप्राचार्य मिनू मदलानी यांनी अहवालाचे वाचन केले. राज्यपालांच्या हस्तेमहाविद्यालयातील सर्वोत्तम विद्यार्थी व विद्यार्थिनींना फिरते चषक प्रदान करण्यातआले. कार्यक्रमाला हिंदुजा समुहाचेसल्लागार सॉलोमन राज, हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष पॉल एब्राहम व शिक्षकवृंद उपस्थितहोते.
**