बंद

    23.01.2021 :राज्यपालांच्या हस्ते लोकमत ट्रेंड सेटर्स पुरस्कार प्रदान

    प्रकाशित तारीख: January 23, 2021

    राज्यपालांच्या हस्ते लोकमत ट्रेंड सेटर्स पुरस्कार प्रदान

    निष्ठाव समर्पण भावनेने कार्य केल्यास देशात सुवर्णयुग येईल:राज्यपाल कोश्यारी 

    एक प्रगत देश म्हणूनउदयास येण्याच्या निर्णायक वळणावर देश उभा असताना युवा पिढीने निष्ठा व समर्पण भावनेनेकार्य केल्यास देशात सुवर्णयुग येईल, असाविश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केला. राज्यातील लोक विविधक्षेत्रात नवोन्मेष व नवसृजनातून उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पदअसून ते युवा पिढीला निश्चितपणे प्रेरणा देईल, असा विश्वास राज्यपालांनीयावेळी व्यक्त केला.  सेंद्रिय शेती, बांधकाम व्यवसाय, उद्योग, आदरातिथ्य, आरोग्यसेवा यांसह विविधक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या ३४ निवडक व्यक्ती व संस्थांनाराज्यपालांच्या उपस्थितीत लोकमत ट्रेंड सेटर्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यातआले, त्यावेळी ते बोलत होते.   सहारा स्टार हॉटेलयेथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला  राज्याचे जलसंपदा मंत्रीजयंत पाटील, ज्येष्ठअभिनेते सचिन पिळगावकर, निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे तसेच लोकमत मिडियासमूहाचे अध्यक्ष विजय दर्डा उपस्थित होते.  पुरस्कारार्थींचाकार्याचा उल्लेख असलेल्या ‘लोकमत ट्रेंड सेटर्स’ या कॉफी टेबलपुस्तकाचे देखील राज्यपालांच्याहस्ते यावेळी प्रकाशन करण्यातआले.   देश आज अभूतपूर्व अशा कालखंडातून जातआहे असे नमूद करून अनेक क्षेत्रात देश गरुडझेप घेत आहे. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. अश्यावेळी नवउदयमी युवकदेशाला खूप पुढे नेऊ शकतात. याकरिता नव उद्योजकांची पिढी तयार झाली पाहिजे असे राज्यपालांनीसांगितले. सुवर्ण महोत्सवी वाटचाल करीत असलेले लोकमत वृत्तपत्र खर्‍या अर्थाने जनतेचाआवाज झाले आहे, असे त्यांनी सांगितले. आपण दिल्ली येथे जातो तसेचराज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार असल्यामुळे गोवा येथे जातो. या दोन्ही ठिकाणी लोकमतवृत्तपत्र आवर्जून वाचायला मिळते, असे राज्यपालांनी सांगितले. राजकारणाबाहेर उल्लेखनीय कार्य करणार्‍यालोकांचा बहुमान करून लोकमतने चांगला पायंडा घातला आहे. लोकमत वृत्तपत्र सत्याधारीतयोग्य बातम्या देत असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.  राज्यपालांच्या हस्ते सचिन पिळगावकर, नागराज मंजुळे, उषा काकडे, चिरागशाह, अभिषेक विचारे, डॉ. मिलिंद शिरोडकर, डॉ. रविराज अहिरराव, डॉ. अमोल डोंगरीकर, सीताराम राणे, राजयोगी मणिलाल छेडा, डॉ. परमेश्वर गटकळ, एस आर व्ही समूह रुग्णालयांचे डॉ.अभय विसपुते, डॉ. सुहास अवचट आणि दीपा अवचट, मोहम्मद शरीफ टीम, योगेश लखणी, किशोर आहुजा, शशि यादव, राजेंद्रपाटील, शिवाजीराव जोंधले आदींचा यांचा सत्कार करण्यात आला.