बंद

    “रत्नाकर मतकरी यांनी राज्याचे साहित्य, नाट्य विश्व समृद्ध केले”: राज्यपाल

    प्रकाशित तारीख: May 18, 2020

    “रत्नाकर मतकरी यांनी राज्याचे साहित्य, नाट्य विश्व समृद्ध केले”: राज्यपाल

    ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी, कलाकार आणि दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्र हे देशातील साहित्य व सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय संपन्न राज्य आहे. राज्याची ही ओळख निर्माण होण्यात येथील विचारवंत व समाजसुधारक यांचेप्रमाणेच येथील प्रतिभासंपन्न साहित्यिक, नाटककार, संगीतकार व इतर थोर लोकांचे योगदान आहे. या गौरवशाली परंपरेचे पाईक असलेल्या रत्नाकर मतकरी यांनी आपल्या साहित्यकृती, नाट्यकृती, बाल साहित्य, गूढकथा, चित्रपट पटकथा, अभिनय व दिग्दर्शनाच्या माध्यमातून राज्याचे साहित्य – संस्कृती विश्व समृद्ध केले. त्यांच्या निधनाने साहित्य आणि नाट्य विश्वाची मोठी हानी झाली आहे, अशी शोक संवेदना राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे.