बंद

    मिफ्फ महोत्सवामुळे माहितीपटांना व्यासपीठ – राज्यपाल

    प्रकाशित तारीख: February 3, 2020

    आंतरराष्ट्रीय फिल्ममहोत्सवाचा समारोप
    मिफ्फ महोत्सवामुळेमाहितीपटांना व्यासपीठ  – राज्यपाल

    मुंबई दि. ३ :फिल्म्स डिव्हिजन मार्फत आयोजित करण्यात येणारा मिफ्फ महोत्सवामुळे आंतरराष्ट्रीयस्तरावरील माहितीपटांना  व्यासपीठ मिळालेअसल्याचे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी आज सांगितले.
    वरळीतील नेहरु सेंटरयेथे 16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल फॉर डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिक्शन आणि ॲनिमेशन अर्थातमिफ्फ 2020 चा सांगता समारंभ आज नेहरु सेटंर येथे झाला. 
    आज भारतीय सिनेमांनाआंतरराष्ट्रीय प्रेक्षक आहेत. यावरून भारतात बनणाऱ्या सिनेमाची ताकत लक्षात येते.कमी वेळेत जास्तीत जास्त कन्टेन्ट प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचे मोठे काम आहे.येणाऱ्या काळात पर्यावरण, संस्कृती, इतिहास यावर अधिकाधिक कन्टेन्ट तयार करण्यात यावा असेआवाहन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी केले.राज्यपाल म्हणाले, माहितीपट हे फिल्म चळवळीची परिभाषाकरणारे महत्त्वपूर्ण अंग आहे. आज हा  महोत्सव जगभरातीलडॉक्युमेंटरी आणि लघुपटांचा सर्वात प्रतिष्ठित उत्सव बनला  आहे.आजवेगवेगळया विषयांवर माहितीपट बनत असून या माध्यमातून अनेक सृजनशील तरुणांचेचित्रपट निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे.  मिफ्फमहोत्सवाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत  असून महाराष्ट्रशासनाने या महोत्सवाला कायम पाठिंबा दिला आहे.
    चित्रपटांच्याप्रमोशनसाठी शासन अधिक प्रयत्न करणार — अमित देशमुखआज महाराष्ट्रातवेगवेगळ्या विषयावर माहितीपट, चित्रपट बनत आहेत. हे माहितीपट, चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंतपोहोचावे यासाठी शासन अधिक प्रयत्न करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमितदेशमुख यांनी सांगितले.
    श्री. देशमुख पुढेम्हणाले, मिफ्फहा लघुपटांसाठी प्रेक्षक शोधणारा प्रशंसनीय चित्रपट महोत्सव आहे. या महोत्सवातकोणता माहितीपट निवडावा, कोणत्या माहितीपटाला किती मार्क द्यावे, कोणते सिलेक्ट करावे हेपरीक्षकांना कठीण झाले यावरून या महोत्सवात येणार कन्टेन्ट कसा आहे हे समजते.
    सांगता सभारंभातउत्कृष्ट माहितीपट, उत्कृष्ट निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.
    यावेळी सांस्कृतिककार्य मंत्री अमित देशमुख, अदिती अमित देशमुख, माहिती आणि प्रसारण विभागाचेसहसचिव अतुल कुमार तिवारी,वेस्ट झोनइन्फॉर्मशन ब्युरोचे महासंचालक मनीष देसाई,दिग्दर्शकव निर्मात्या उषा देशपांडे, माजी नगरपाल किरण शांताराम, राहुल रवैल, मिफ्फ महोत्सवाच्या संचालक स्मितावत्स- शर्मा, राष्ट्रीयमाहितीपटासाठीचे जुरी थॉमस वॉग, आदी मान्यवर उपस्थित होते.

    ००००