एअर चिफ मार्शल (निवृत्त) ओ.पी.मेहरा (03.11.1980 – 05.03.1982)
विद्याविषयक अर्हता:
- 1940 मध्ये पंजाब विद्यापीठातून इतिहास हा विषय घेऊन एम.ए.
- 30 नोव्हेंबर, 1940 रोजी हवाई दलात कारकीर्द सुरू केली.
- 15 जानेवारी, 1973 रोजी हवाई दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती
सांविधानिक नियुक्त्या:
- महाराष्ट्राचे राज्यपाल (3 नोव्हेंबर, 1980 ते 6 मार्च 1982)
- राजस्थानचे राज्यपाल (6 मार्च, 1982 ते 4 नोव्हेंबर 1985)
इतर महत्त्वपूर्ण व्यावसायिक कामगिरी:
- ऑस्ट्रेलियात संयुक्त प्रमुखांचे भारताचे हवाई दलाचे प्रतिनिधी – 1946 ते 1947
- अधिष्ठाता, इन्स्टिटयूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी, पुणे 1960 ते 1963
- अध्यक्ष, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमि. बंगलोर मार्च 1971 ते ऑक्टोबर 1973
व्यावसायिक संस्थांबरोबरचा सहभाग:
- एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे सन्मान्य सदस्य
- अध्यक्ष, एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया 1947 ते 1977
- उपाध्यक्ष, सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज
- सदस्य, सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज
- सदस्य, श्री.सत्यसाई इंटरनॅशनल सेंटर आणि मानवी मूल्यांचा प्रचार करणा्रया
शाळा यांची व्यवस्थापन समिती
क्रीडाविषयक संलग्न कार्ये:
- अध्यक्ष, ऑलिम्पिक काऊंन्सिल ऑफ एशिया हनी लाईफ
- अध्यक्ष, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन
- अध्यक्ष, एशियन गेम्स फेडरेशन ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाचे
पुनर्नामकरण झाल्यापासून 1978-1980
- अध्यक्ष, दिल्ली जिमखाना क्लब (2 वर्षे)
- अध्यक्ष, दिल्ली गोल्फ क्लब लिमि. (ऑक्टोबर 1994 पर्यंत 2 वर्षे)
- अध्यक्ष, दिल्ली रेस क्लब लिमि. ( 4 वर्षे )
- उपाध्यक्ष, सर्व्हिस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड, 4 वर्षांकरिता
- उपाध्यक्ष, भारतीय हॉकी संघटना (6 वर्षे)
- अध्यक्ष, दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (2 वर्षे)
- सदस्य व नंतर अध्यक्ष, ड्यूराँड कप फूटबॉल (1973 ते 1975)
आंतरराष्ट्रीय संघटनांबरोबरचा सहभाग:
- संचालक, सी.आय.इंटरनॅशनल हॉटेल्स लिमि.
- संचालक, पॉलिप्लेक्स कॉर्पोरेशन लिमि.
- संचालक, मेयर इंडिया लिमि, न्यू दिल्ली
- संचालक,अडयार गेट हॉटेल्स लिमि. चेन्नई
- संचालक, अन्सल प्रॉपर्टीज अँड इंडस्ट्रीज लिमि.
- अध्यक्ष, आरओपी एसएसए प्रॉपर्टीज अँड एन्टरप्राइजेस प्राय.लिमि.
सन्मान आणि पुरस्कार:
- परम विशिष्ट सेवा पदक – जानेवारी 1968
- पद्मविभूषण – जानेवारी 1977
- श्रीमोनी पुरस्कार – 1988
- राजीव रत्न पुरस्कार – 1991
- हेल्पएज इंडिया गोल्डन पुरस्कार – 1999
- भारतीय हवाई दलात सेवा केल्याबद्दल उल्लेखनीय नेतृत्त्व पुरस्कार
- अमेरिकन बायोग्राफीकल इन्स्टिटयूट यांनी दिलेला नॅशनल सिक्युरिटी ॲवार्ड