बंद

    “भारतीय क्रिकेटसाठी अजित वाडेकर यांचे योगदान अतुलनीय”: राज्यपाल

    प्रकाशित तारीख: August 16, 2018

    महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व व्यवस्थापक अजित वाडेकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.

    अजित वाडेकर हे आक्रमक फलंदाज व भारतीय क्रिकेट संघाचे यशस्वी कर्णधार होते. अजित वाडेकर यांनी भारतीय क्रिकेट संघाला परकीय भूमीवर विजय प्राप्त करुन देऊन केवळ क्रिकेटपटूंचेच नव्हे तर देशातील सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावले होते. अजित वाडेकर यांनी भारतीय संघाला जिंकण्याची सवय लावली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

    भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक तसेच निवड समितीचे सदस्य या नात्यानेदेखिल वाडेकर यांनी बहुमोल कार्य केले. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वातील एक दैदिप्यमान तारा निखळला आहे, असे राज्यपाल विद्यासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.