बंद

    छत्तीसगडच्या राज्यपालांच्या निधनाबद्दल राज्यपाल विद्यासागर राव यांना दुःख

    प्रकाशित तारीख: August 14, 2018

    छत्तीसगडचे राज्यपाल बलराम दास टंडन यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी दुःख व्यक्त केले आहे. टंडन यांनी आयुष्यातील सात दशके जनतेची सेवा केली. ते कुशल संघटक होते तसेच पंजाब विधानसभेचे अनेकदा सदस्य होते. छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून काम करताना आपल्या नि:पक्ष वर्तनातून त्यांनी पदाची गरिमा जपली. श्री टंडन यांचेशी आपला घनिष्ट परिचय होता. ते एक सुहृद व्यक्तित्व होते. त्यांच्या निधनाने देशाने एक उत्तम संसदपटू तसेच निष्ठावान लोकसेवक गमावला आहे, असे विद्यासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.