केरळ पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे राज्यपालांचे विद्यापीठांना आवाहन
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना केरळ राज्यातील पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले.
विद्यापीठ व महाविद्यालयांनी निधी संकलन करावे तसेच केरळ राज्यातील जनतेच्या मदत आणि पुनर्वसनाच्या कार्याला मदत करावी असे त्यांनी आवाहन केले.
राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी संपर्क साधून राज्यपालांचे आवाहन कळविले आहे.
विद्यापीठांनी केरळ राज्यातील पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी पंतप्रधान सहायता निधीला मदत करण्याची सूचना त्यांनी कुलगुरूंना केली आहे.
राज्यात २० विद्यापीठे असून अंदाजे २३ लाख विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत.