बंद

    अझिज मक्की यांचे समाज कार्य प्रेरणादायी“समाजात अधिकाधिक सकारात्मक कार्य होणे ही काळाची गरज” : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: January 30, 2020

    अझिज मक्की यांचे समाज कार्य प्रेरणादायी
    “समाजात अधिकाधिक सकारात्मक कार्य होणे ही काळाची गरज” : राज्यपाल

    सच्चा सेवाभावी कार्यकर्त्याला मानसन्मानची अपेक्षानसते. चांगले काम केल्यावर त्यातून मिळणारा आनंद व आत्मिक समाधान हेच त्याचेबक्षीस असते. आज सर्वच क्षेत्रात नकारात्मकता वाढत असताना समाजसेवी अझिज मक्कीयांच्याप्रमाणे अधिकाधिक सकारात्मक कार्य होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आजयेथे केले.
    ज्येष्ठ समाजसेवी अझिज मक्की यांच्या समाजसेवाकार्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंजुमान ए इस्लाम शिक्षण संस्थेच्या वतीने अंजुमनच्याकरिमी ग्रंथालय येथे त्यांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी राज्यपालबोलत होते.
    नागपाडा येथील ‘पी.टी. माने उद्यान’ या बहुउद्देशीय संकुलाच्यानिर्मितीतून गरीब रुग्णांना मोफत डायलिसीस सेवा, कम्प्युटर प्रशिक्षण वर्ग, यांसारखीनि:स्वार्थ सेवा करीत असल्याबद्दल राज्यपालांनी अझिज मक्की यांचे कौतुक केले, तसेच आपण माने उद्यान संकुलास भेट देऊन सेवाकार्याचीव्यक्तिशः पाहणी करू, असे आश्वासन यावेळी दिले.   
    सत्कार सोहळ्याला खासदार हुसेन दलवाई, आमदार रईस शेख, अंजुमनचेअध्यक्ष डॉ. झहीर काझी, उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले,  मौलाना अथर अली, तसेच विविध क्षेत्रातीलमान्यवर उपस्थित होते.   
    भारतात आजवर महिलांनी खूप कष्ट सोसले आहेत, आजही अनेक महिलांचे जीवन कष्टप्रद आहे. त्यामुळेदेशाच्या सर्वांगीण प्रगतीकरिता महिलांच्या उत्थानसाठी व सक्षमीकरणासाठी सर्वांनीप्रयत्न करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले.जवळजवळ दीडशे वर्षांचा इतिहास लाभलेली अंजुमन यासंस्थेचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉझहीर काझी यांनी सांगितले. संस्थेच्या भव्य ग्रंथालयात भगवतगीता, बायबल, कुराण यांची विविधभाषांमधील भाषांतरे तसेच इतर दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अंजुमन देशात ११० शैक्षणिक संस्था चालवीत असून १ लक्ष १० हजार विद्यार्थीतेथे शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. 
    चित्रपटनिर्माते इस्माईल मर्चंट, अभिनेते दिलीप कुमार, माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले, क्रिकेटपटूगुलाम परकार, वसीम जाफर आदि अंजुमनचे माजी विद्यार्थीअसल्याचे त्यांनी संगितले.