बंद

  ३०. ११. २०२१: 1 ओटीटी’ या नवीन ‘ओव्हर द टॉप’ प्लॅटफॉर्मच्या बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

  प्रकाशित तारीख: December 1, 2021

  1 ओटीटी’ या नवीन ‘ओव्हर द टॉप’ प्लॅटफॉर्मच्या बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

  अभिनेता स्वप्नील जोशी आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘1 ओटीटी’ या नवीन ‘ओव्हर द टॉप’ प्लॅटफॉर्मच्या बोधचिन्हाचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई करण्यात आले.

  ‘1 ओटीटी’ हे व्यासपीठ हे सर्व भारतीय भाषांमधील कार्यक्रमांसाठी तयार करण्यात आले असून त्याद्वारे हिंदीसह मराठी, बंगाली व इतर भारतीय भाषांमधील कार्यक्रम सादर केले जाणार असल्याची माहिती यावेळी स्वप्नील जोशी यांनी दिली.
  स्वप्नील जोशी, नरेंद्र फिरोदिया, विनायक सातपुते, वेंकटेश श्रीनिवासन, राजीव जानी, सतीश उतेकर, चेतन मणियार, संदीप घुगे आणि त्यांच्या चमूतील इतर यावेळी उपस्थित होते.