बंद

  ३०. ०१. २०२० :  ‘ऑल दॅट आय ऍम’ या कॉफी टेबल पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

  प्रकाशित तारीख: January 31, 2020

  मंजू लोढा यांच्या ‘ऑल दॅट आय ऍम’ या कॉफी टेबल पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

  समाजसेविका, लेखिका व कवयित्री मंजू लोढा यांच्या ‘ऑल दॅट आय ऍम’ या चरित्रात्मक कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ३०) राजभवन येथे झाले.

  मंजू लोढा उत्तम वक्त्या व कवयित्री असून त्यांच्या तरल काव्याइतक्याच त्या जमिनीवर घट्ट पाय असलेल्या मानवतावादी व्यक्ती आहेत. सनातन धर्म व जैन धर्माच्या संस्कारांमुळे त्या सत्याच्या अधिक निकट आहेत. आपल्या काव्यातून तसेच उर्जावान वक्तृत्वातून त्या जीवनाकडे पाहण्याची उच्च दृष्टी देतात, असे राज्यपाल कोश्यारी यावेळी म्हणाले. हे पुस्तक हिंदी तसेच प्रादेशिक भाषेतून निघावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

  यावेळी आमदार मंगल प्रभात लोढा, अमृता फडणवीस, नृत्य दिग्दर्शक संदीप सोपारकर, फिटनेस गुरु मिकी मेहता, नवभारत टाईम्सचे संपादक सुंदरचंद ठाकूर, टाइम्स समूहाचे उपाध्यक्ष राहुल धर आदि उपस्थित होते. टाइम्स ग्रुप बुक्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.